Top News

आइकॉन बहुद्देशीय संस्थेतर्फे संविधान दिन व महात्मा फुले स्मृतिदिन साजरा.

Bhairav Diwase.            Nov 28, 2020
नागभीड:- आज दि.28/11/2020 ला स्थानीक तुकुम (ति)तह.नागभीड़ जिल्हा चंद्रपुर येथे 26 नोव्हेंबर संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता गावातील प्रमुख पाहुणे गावातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महीने 18 दिवस अहोरात्र मेहनत घेऊन जगातील सर्वश्रेष्ठ भारतीय संविधान लिहल यात 12 परिशिष्ठ, 22 विभाग,आधी 395 कलमे तर आता 448 कलमे अश्या प्रकारची जगातील सर्वात मोठी संविधान तयार करण्यात डॉ. बाबासाहेबांचा सर्वात मोठा वाटा आहे.
       
        भारतीय संविधानात सर्वात सुंदर संविधान प्रास्ताविका लिहिली आहे ज्याची सुरवात आम्ही भारताचे लोक----------- 26 नोव्हेंबर 1949 रोजी आत्मसात करुन 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आली.
        
      ज्यामधे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिर्पेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक, असल्या प्रकारचे मूल्य आहेत. ज्यामुळे सामान्य नागरिकाना सुद्धा योग्य असा न्याय मिडतो 

    असाच या जगातील महान अशा संविधान दिनाचे औचित्य साधुन संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले.
        या कार्यक्रमाला अध्यक्ष मनुंन युवा सामाजिक कार्यकर्ता मान.श्रीनंदन रमेश गजभे (msw) प्रमुख पाहुणे म्हणून परम चौके, वैभव श्रीरामें, याच बरोबर गावातील नागरिक व गावातील शालेय विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी संविधानाचे महत्व व संविधानाचे जीवनातील अमूल्य स्थान या बद्दल मोलाची माहिती दिली, याच सोबत संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे उत्कृठ सूत्रसंचालन किरण गडमडे युवा कार्यकर्ता तर सर्वांचे आभार प्रदर्शन खुसबू विलास गजभे हिने मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने