Top News

शेकडो कार्यकर्त्यांचा सेवा बंधन बांधून प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश.

नवनियुक्त जिल्हा संपर्क प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांच्या अध्यक्षतेखाली केला प्रहार पक्षात प्रवेश.

रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांना जिल्हा संपर्क प्रमुख मिळाल्याने कार्यकर्त्यांन मध्ये नवचैतन्य.
Bhairav Diwase. Nov 28, 2020

चंद्रपूर:- दिनांक 28/11/2020 ला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर, सिंदेवाही तालुक्यातील शेकडो युवक व शेतकरी बांधवांनी सेवा बंधन बांधून प्रहार मध्ये प्रवेश केला.
    नामदार बच्चूभाऊ कडू (शालेय शिक्षण,कामगार, जलसंपदा, महिला व बालकल्याण विकास राज्यमंत्री महाराष्ट्र् राज्य) यांचा आदेशानुसार पक्ष बांधणी व पक्ष विस्तारा संदर्भात रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांना चंद्रपूर गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. व त्याच जोमाने रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनी जिल्ह्याचा आढावा घेत तालुका निहाय बैठक तीन दिवसीय दौऱ्यात लावल्या आज पहिल्याच दिवशी पहिलाच दौरा चिमुर व सिंदेवाही तालुक्याचा केला.
            यात असंख्य युवक व शेतकरी यांनी प्रहार मध्ये सेवा बंधन बांधून पक्षात प्रवेश केला यातच अनेक राजकीय पक्षांना खिंडार पडले कुबडे याना जिल्हा संपर्क प्रमुख मिळाल्याने कार्यकर्त्यांन मध्ये उत्साह पाहायला मिळाला. व आता जोमाने पक्ष वाढीसाठी कामाला लागा असा सल्ला कुबडे यांनी कार्यकर्त्यांना दिला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अक्षय मराठे, विशाल निकारे, जीवन तोगरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रहार सेवक शेरखान पठाण, प्रवीण वाघे, सिंघल पाटील व चिमुर सिंदेवाही तालुक्याचे असंख्य कार्यकर्त्यानी नियोजन पद्धतीने काम पार पडले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने