Top News

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पोंभुर्णा तर्फे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना आदरांजली.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. जनतेने मुंबईतील सभेत १८८८ मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. फुलेंची बुद्धी अतिशय तल्लख होती, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.त्यांनी लिहलेला ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड’ रचले. आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांच ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. महात्मा फुले नावाने हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.
        
          महात्मा ज्योतिबांचे विचार आजही समाजाला प्रेरणादायी आहेत. ज्योतिबा नसते क्रांतीज्योती सावित्रीबाईच्या पुढाकारातून मातृ शक्तीचा विकास झाला हे मात्र तितकेच खरे. महात्मा ज्योतिबा फुले यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पोंभुर्णा यांच्या कडून आदरांजली वाहिली गेली. यावेळी भुजंगराव ढोले तालुका अध्यक्ष अ. भा. महात्मा फुले समता परिषद पोंभुर्णा, सदगुरु ढोले ज़िल्हा सचिव. अ. भा. महात्मा फुले समता परिषद चंद्रपूर, कल्पना ताई गुरनुले अध्यक्ष माळी समाज, पोंभुर्णा, अनिताताई गुरनुले सचिव माळी समाज पोंभुर्णा दयानंद गुरनुले, नलूजी गुरनुले, ओमेश्वर पदमगिरीवार, गुरूदास गुरनुले, ऋषीजी कोटरंगे, पराग मूलकलवार, गुलाब गुरनुले, शाम गेडाम, दिवाकर गुरनुले, श्रीकांत शेंडे, चरण गुरनुले, तेजराज मानकर, माळी समाज बांधव व गावातील प्रतिष्ठित नागरिक आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने