(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- राज्यात "महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान" या नावाने हे अभियान राबविण्यात येत आहे. त्या अभियानाला "उमेद" असेही म्हणतात. याच उमेदने महाराष्ट्रातील लाखो महिलांना स्वयंरोजगाराची वाट दाखवली. याचाच एक भाग पोंभुर्णा तालुक्यात दिसुन येत आहे. पोंभुर्णा तालुक्यातील उमेद अंतर्गत दिवाळी फराळ विक्री केंद्र सुरू करून महिलांनी स्वयंरोजगाराची वाट धरली आहे. यामुळे तालुक्यातील जनतेला दिवाळी साठी फराळ बनविण्याचा त्रास कमी झाला आहे.
'"उमेद" अर्थात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान यामध्ये महिलांना संघटित करून त्यांच्या उपजिविका चे साधन निर्माण करून देणे आहे. त्यासोबतच विविध प्रकारच्या योजना हि त्यात राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी उमेद कडुन प्रयत्न केले जात आहे. पोंभुर्णा येथील बस स्थानक परिसरात हे फराळ विक्री केंद्र सुरू आहे. त्याला पोंभुर्णावासीयांकडुन चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या फराळ विक्री केंद्र चे उद्घाटन बिडिओ धनंजय साळवे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून, भिमानंद मेश्राम तालुका अभियान व्यवस्थापक उमेद राजेश दुधे प्रभाग समन्वयक बंडु लेनगुरे, प्रभाग समन्वयक निलेश अहिरे, प्रभाग समन्वयक ( सेंद्रिय शेती ) संघर्ष रंगारी, अनिता वाकुळकर, भावना देवगडे, वर्षा आत्राम तसेच इतर उद्योग सखी उपस्थित होते.