नकोडा येथे गुंडांचा हौदोस.
Bhairav Diwase. Nov 12, 2020
चंद्रपूर:- बुधवारला रात्री ९ वाजता दरम्यान घुग्घुस येथुन जवळच असलेल्या अती संवेदनशील असलेल्या नकोडा गावात तेथीलच गुंडांनी मोठा हौदोस घातला.
दैनिक विदर्भ कल्याणचे नकोडा येथील पत्रकार व माजी उपसरपंच हनिफ मोहम्मंद आपल्या मयत मुलाचा वाढदिवस ते कुटुंबासह घरा शेजारील चौकात साजरा करीत असतांना नकोडा येथील शहनवाज हबीब पटेल, सरफराज हबीब पटेल, आरिफ कादर शेख, नवीन दुर्गय्या तोटा, पिंटु मुक्के, लक्ष्मीनारायण दुर्गा कोडापे, दिनेश कोंकटी, अस्सु, संतु व राजेश यांनी तिथे जाऊन शुल्लक कारणावरून वाद घालत व हनिफ मोहम्मंद यांना व त्यांच्या पत्नी, मोठ्या बंधुला व वहिनीला लोखंडी राँड व लाठ्याकाठ्यांनी १० ते १५ गुंडांनी जबर मारहाण केली. गुंडांनी अक्षरशः धुमाकूळ घालीत त्यांच्या घरांच्या सामानाची नासधूस करुन उभ्या वाहनांची तोडफोड केली.
त्यामुळे नकोडा गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हनिफ मोहम्मंद यांनी कुटुंबासह घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध कलम ३२४, ३२३, ४५२, ४२७, २९४, ५०४, ५०६, १४२, १४३, १४४, १४७, १४८ (३४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि.राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात सह.पो.नि. गोरक्षनाथ नागलोत करीत आहे.
(बातमी संकलन:- पंकज रामटेके)