Top News

एक प्रहार; पालकांच्या हिताचा.A blow; In the interest of the parents.

हिंगणघाट येथील जेष्ठ पत्रकार सतिषभाऊ वखरे यांचा लेखणीतून.
Bhairav Diwase. Nov 27, 2020
बलाढ्य मदोन्मत्त हत्तीचे गंडस्थळ फोडणे हे साधेसुधे काम नाही. परंतु गजू कुबडे सारख्या एका साधारण कार्यकर्त्याने या बलदंड हत्तीला आपले राजकीय गुरू ना. बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून एका महत्वपूर्ण प्रश्राची तड लावली. ना.कडू हे अंदाजे तीन महिन्यापूर्वी एका खासगी भेटीसाठी आपले कार्यकर्ते गजुभाऊ कुबडे यांच्या निवासस्थानी अकस्मात आले. त्यावेळी चर्चेच्या ओघात गजुभाऊ याने येथील गिरधारीदास मोहता विद्या मंदिरात नियमबाह्य पद्धतीने विध्यार्थी वर्गाकडून बेभाव फी वसूल करीत असल्याचे प्रकरण घातले. ना.कडू यांनी त्वरेने या प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी या वाढीव फी मूळे त्रस्त असलेले काही पालक व सामाजिक कार्यकर्ते सुनील डोंगरे, हसन अली अजानी, नितीन क्षीरसागर, चेतन वाघमारे, चंद्रकांत नंदकर, दर्शन बाळापुरे, मनोज रुपारेल, हितेंद्र हेमके किशोर शेगोकर, दिनेश वर्मा, देवेंद्र वर्मा व अनेकांनी या बाबतीत एक सविस्तर लेखी निवेदन ना.कडू यांना सादर केले.
 ना कडू यांनी या निवेदनाची दखल घेत या बाबत नियमानुसार कारवाई सुरू केली. कायदा आपलं काम संथ गतीने करीत होता, तर त्याच वेळी पैसा व सत्तेच्या भरोशावर आपण काहीही खिशात घालू शकतो या भ्रमात असलेल्या मोहता ग्रुपने अहंकारात निवेदन घेऊन आलेल्या पालकांना कमीपणाची वागणूक देत आपल्या हेकेखोर वृत्तीचा परिचय दिला. दुसरीकडे गजुभाऊ कुबडे सारखा एक फाटका कार्यकर्ता आपले काय बिघडवणार? या कल्पनेत राहणाऱ्या मोहता ग्रुपला 100 वर्षापेक्षाही अधिकच्या काळात पहिल्यादाच असा जबर झटका दिला की त्यांनाही नानी याद करून दिली.
             जे भलेभले करू शकले नाही ते गजकुबडे या सामान्य कार्यकर्त्याने एक असाधारण काम केले.या विद्या भवनने जी जादा फी पालकां पासून वसूल केली ती ४ कोटी ४६ लाख ४२ हजार २०६ रुपये पालकांना वापस करण्याचा आदेश राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या नागपूर येथील उपसंचालकांनी दिलेला आहे.या आदेशानुसार मोहता विद्या भवनला वाढीव शुल्क पालकांना तातडीने वापस करावयाचे आहे.
                   ना.बच्चूभाऊ कडू यांचे सारखा ध्येयसमर्पित राज्यसरकारचे प्रतिनिधी, त्यांचे गजुभाऊ कुबडे यांचे सारखे निस्वार्थ कार्यकर्ते, तसेच अभ्यासपूर्णरित्या सरकारदरबारी हा प्रश्न मांडणारे नगरसेविका सौ शुभांगी डोंगरे, सुनील डोंगरे, किशोर शेगोकर, व अन्य कार्यकर्ते हसन अली अजानी, व असंख्य बिनीच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही दडपणाला बळी न पडता ज्या पद्धतीने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शेवट पर्यंत लढा दिला व सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून दिला ते प्रशंसनीय आहे.सर्वसामान्यांची वज्रमूठ काय चमत्कार करू शकते व बलाढ्य शक्तीला कसे लोळवू शकते याचे भवन्सचा अहिंसेच्या मार्गाने दिलेला लढा एक उत्तम उदाहरण आहे.
 
  ब्रेव्हो गजुभाऊ
   तुमच्या कार्याला सलाम 

लेखक:- सतीश वखरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने