कविता:- दिवाळी Diwali

Bhairav Diwase
कवी:- किशोर बळीराम चलाख
चंद्रपुर
🪔 दिवाळी

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
आली आली दिवाळी
घट्ट करू सणाची साखळी
प्रेम आणि आपुलकीने
चला साजरी करू दिवाळी

फटाकेमुक्त होऊ द्या सण
प्रदूषण दूर सारूया
घरात येती आनंदाचे क्षण
निसर्गाचे रक्षण करूया

घराघरात आनंद नांदे
दीप लावूया सांजा
मिळती नातलग समदे
सुट्टीची घेऊया मज्जा

सण येती आनंदाचे
राखुया नाते निसर्गाशी
योग जुळती भेटण्याचे
सौख्य जपुया सणाशी

दिव्याच्या या प्रकाशाने
अंधार दुर करू मनातला
जपुया गोडवा सारा
आपल्या या नात्यातला


कवी:- किशोर बळीराम चलाख
चंद्रपूर
मो. 9405900987