11 वीत शिकणाऱ्या मुलीची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.       Dec 15, 2020
चंद्रपूर:- स्थानिक माजरी वस्ती येथिल एक 20 वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरी घरा च्या स्लैब च्या पंख्या ला दोरीने फांसी लावून आत्महत्या केली ही घटना आज दिनांक 15 डिसेंबर ला दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. मृतक मुलीचे नाव कु. जयश्री मोरेश्वर आस्वले वय 20 वर्ष माजरी वस्ती येथे राहत असून ही मुलगी इयत्ता अकरावीला कर्मवीर विद्यालय माजरीत शिकत होती. मृत्यू चे कारण कळू शकले नाही. मुलीने आत्महत्या केली त्यावेळी मुलीचे वडील मजुरी करिता व आई शेतात कामा करिता गेले होते.


     माजरी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन व पंचनामा करून मृत्यू मुलीचे शरीर शवविच्छेदन करीता वरोराचे उपजिल्हारुग्णालयात येथे पाठविले असून माजरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार विनीत घागे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई चोपणे तपास करत आहे.