नांदगाव पेट्रोल पंप (फुटाणा क्रासींग) जवळ घटना.
मुल:- नांदगाव पेट्रोल पंपाच्या फुटाणा क्रासींग लगत दुचाकीस्वाराला जेसीबीची धडक बसल्याने दुचाकीस्वाराचे आतडेच बाहेर निघाल्याची घटना आज दु. २.०० वाजताच्या सुमारास दरम्यान घडली. जखमीला गोंडपिपरीवरून चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केलेले आहे.
बेंबाळ येथे वास्तव्यास असलेले सुभाष पाणीग्रही (३५) हा पत्नीसह दुचाकी क्र. एम.एच.३४ पी. १८१० ने घाटकुळ वरून येत असताना नांदगाव जवळील फुटाणा क्रासींगवर अज्ञात जेसीबी चालकाने धडक दिली. यात दुचाकी स्वार सुभाष यांचे आतडेच बाहेर निघाले. घटनेनंतर चालक जेसीबीसह पोबारा केला.