वढा-जुगाद यात्रा बंदला उत्तम प्रतिसाद.

पहिल्यांदा यात्रा कोरोना मुळे खंडीत.
Bhairav Diwase. Dec 01, 2020
चंद्रपूर:- घुग्घुस येथुन जवळच असलेल्या वढा येथे दरवर्षी कार्तिक पोर्णीमेला वढा-जुगात गावातील वर्धा-पैनगंगा-निर्गुडा या तिन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर मोठी यात्रा भरत होती. परंतु कोरोना खबरदारीच्या पार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबर २०२० रोजी कार्तिक पौर्णीमेला भरनार असलेली वढा-जुगाद यात्रा रद्द करण्यात आली होती.

          सकाळी पासूनच घुग्घुस पोलिसांनी पांढरकवडा गावात दोन बँरेगेट लावून चार चाकी वाहनांसाठी रस्ता बंद केला होता. 

            सकाळी चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वढा तिर्थक्षेत्रास भेट देऊन कोरोनाचे संकट दुर होण्यासाठी विठ्ठला चरणी प्रार्थना केली. प्रार्थनेसाठी मंदिर उघडी असल्याने काही भक्तांनी पायदळ वारी करुन विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेतले. रविवारी कार्तिक स्वामीच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली होती.

          नदीच्या पलिकडे जुगात येथे पुरातन हेमाडपंतीय शिव मंदिर आहे तिथे ही भाविक आस्थेने दर्शनासाठी जाताता.
परंतु यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वढा-जुगाद यात्रा रद्द करण्यात आली आहे. बाहेर गावातुन हजारोंच्या संखेत भाविक येत असल्याने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी व एकमेकांशी संपर्कात न येण्यासाठी खबरदारी करीता वढा-जुगाद यात्रा रद्द करण्यात आली होती.

              यावेळी भाविकांनी यात्रा रद्द झाल्याच्या आव्हानास उत्तम प्रतिसाद दिल्या बद्दल वढा ग्रामपंचायतीचे प्रशासक आर. पी. नाईक, वढाचे माजी उपसरपंच बंटी भोस्कर, वाढाचे ग्रामसचिव श्रीकांत कदम, पांढरकवडा उपसरपंच समिर भिवापुरे यांनी आभार मानले. 

          घुग्घुसचे सहा.पो. निरिक्षक गोरक्षनाथ नागलोत, गुन्हे शाखेचे गौरीशंकर आमटे,सुधीर मत्ते, दिनेश वाकडे, किशोर रिंगोले यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने