आजी बाळाच नाक साफ करताना श्वसन नलिकेत गेली सेफ्टीपिन.
चंद्रपुर:- दीड महिन्याचा मुलगा रियांशच्या नाकात सेप्टिपीन गेली . डॉ . मनीष मुंधडा अत्यंत प्रभावी पणे आकस्मित सर्जरी करून दीड महिन्याचा मुलाचा श्वसन नलीकेतून कुठलेही चिरफाड न करता अगदी योग्य पद्धतीने ऑपरेशन करून सेप्टिपिन काढुन मुलाचे जीव वाचविले.
चंद्रपूर जिल्हा कारागृहात गळफास घेत कैद्याने केली आत्महत्या.
वरोरा येथे राहणारे निखिल बाबुराव मडावी यांचा दीड महिन्याचा मुलगा रियांशला आजी आपल्या जवळ घेऊन नाक साफ करीत होती. मुलाने श्वास घेतल्यामुळे पीन घशात गेली. त्या मुळे बाळाला खोकला येऊन त्रास होऊ लागला. वडील गडचिरोलीला गेल्यामुळे घरमालकाचा मदतीने रियांश ला वरोरा येथील बालरोग तज्ञ डॉ. देवतळे यांचा हॉस्पिटल ला नेण्यात आले. डॉ. देवतळे यांनी एक्सरे काढून बघितले, तेव्हा पीन ही श्वसन नलिकेत अळकल्याचे लक्षात आले.
यानंतर डॉ . देवतळे यांनी चंद्रपूर येथील प्रसिद्ध नाक, कान, घसा तज्ञ डॉ. मनीष मुंधडा यांचाकडे पाठविले. डॉ. मनीष मुंधडा अत्यंत प्रभावी पणे आकस्मित सर्जरी करून दीड महिन्याचा मुलाचा श्वसन नलीकेतून कुठलेही चिरफाड न करता अगदी योग्य पद्धतीने ऑपरेशन करून सेप्टिपिन काढून जीव वाचविल.
या वेळेस सुंघनी तज्ञ डॉ. सलीम तुकडी, बालरोग तज्ञ डॉ. गोपाल मुंधडा, बालरोग तज्ञ डॉ. इर्शाद शिवजी यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले. आता बाळ पूर्णप्रमाणे सुखरूप असून, कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.