चामोर्शी:- चामोर्शी परिसरा मध्ये पोलीस भरती ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थांना सराव करण्यासाठी मैदानाची सोय नसल्याचे लक्षात येताच युवा संकल्प ग्रुप चामोर्शी यांनी सध्या साठी चामोर्शी परिसरातील यशोधरा हायस्कूलच्या बाजूच्या जागे मध्ये साफ सफाई करून च्या विद्यार्थ्यांच्या हिता साठी पायाला इजा होऊ नये म्हणून काटे व खळक्यांची साफ सफाई करण्यात आली. आणि चामोर्शी परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी पोलीस भरती च्या सरावासाठी यावे असे आव्हान युवा संकल्प करीत आहे.
यावेळी उपस्थित युवा संकल्प ग्रुप चामोर्शी प्रमुख सुरज नैताम, सदस्य युवराज काटवले, आयुष मुळे, ओम मशाखेत्री, ओम बोदलकार, देवराव नैताम, स्वप्निल चिचघरे सागर सातपुते, गोपाल नदेश्वर, चेतन मेश्राम, अभय सुरजागडे व पोलीस भरतीची तयारी करणारे विध्यार्थी उपस्थित होते.