रक्तदान श्रेष्ठदान- प्राचार्य, सी. ए. निखाडे
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- देशात असलेल्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा गोंडवाना विद्यापीठाच्या आदेशानुसार आज दिनांक २२/१२/२०२० ला स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स गोंडपिपरी येथे राष्ट्रीय सेवा योजना तथा प्राणिशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर निखाडे सर यांनी रक्तदान हे कसे श्रेष्ठ दान आहे हे त्यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केले.
तसेच रक्तदान आतून सामाजिक बांधिलकी कशाप्रकारे जपली जाते हे प्राध्यापक डॉक्टर आशिष चव्हाण यांनी आपल्या प्रबोधनातून व्यक्त केली. प्रस्तुत शिबिर आज सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी सुरू झाले. या शिबिरासाठी कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली होती.
या शिबिरात एकूण 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले ते याप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर आशिष चव्हाण, प्रा. उमेश वरघने, प्रा. महेंद् अक्कलवार, श्री. भूपेश काळे श्रीविद्या वाटवर, आचल मेश्राम, सुचित पेंदोर, विजय मेश्राम, शील वर्धन मुनजनकर गणेश पिंपळशेंडे, टिकोबुद्ध दास वाळके, शुभम रामटेके, भुवन देवग डे, श्याम साळुंखे, राजेश म डुर वार, रितेश बट्टे, सतीश गांधमवर, चेतन यशवंतवार, नितेश कोवे, नयना निखाडे अनिशा फुलझेले, आदर्श मडावी, प्रतीक पौनिकर, विकास पुणेकर, प्रशांत कुलकर्णी आणि दीपक वांढरे या रक्तदात्यांनी रक्तदान केले. महाविद्यालयातर्फे या सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.