भाजयुमो चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न.
चंद्रपूर:- दि. १६ डिसेंबर रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात नुकताचं गठीत झालेल्या भाजयुमो जिल्हा कार्यकारिणीची पहिली बैठक तथा आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राचे शुभारंभ भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जनसंपर्क कार्यालय, बल्लारपूर येथे पार पडले.
यावेळी, आदरणीय सुधीरभाऊं मुंगटीवार, आदरणीय हंसराज भैय्या अहिर,मा श्री देवराव भोंगळे ,मा श्रीअशिष देवतळे या सर्व पदाधिकारी व वरोरा तालुक्यातील पदाधिकारी यांचे सचिन नरड यांनी आभार मानले व पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी आणि पक्षाचा विचार, तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करत राहू अशी प्रतिज्ञा घेतली.
तसेच याठिकाणी माजी जिल्हाध्यक्ष श्री. हरीशभैय्या शर्मा, जेष्ठ नेते प्रमोदजी कडू, भाजपचे शहराध्यक्ष काशीसिंह, नवनियुक्त महामंत्री विवेक बोढे आदींनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत अतिशय विस्तृतपणे मार्गदर्शन केले.
पार पडलेल्या या कार्यक्रमाला, कामगार आघाडी प्रदेश महामंत्री अजयजी दुबे, चंद्रपूर महानगर शहर उपाध्यक्ष सुरेशजी तालेवार, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री महेश देवकते व सचिन नरड , नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष , जिल्हा सचिव व सदस्य आदींची उपस्थिती होती.