Top News

पोंभुर्णा येथे राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन.

महाविद्यालयांमध्ये दिनांक. 21/12/2020 रोजी रक्तदान शिबीर आयोजित.
Bhairav Diwase.             Dec 16, 2020


पोंभुर्णा:- मा. राज्यमंत्री महोदय उच्च व तंत्र शिक्षण यांच्या कार्यालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रामध्ये सद्य:स्थितीत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी आपल्या महाविद्यालयांमध्ये दिनांक. 20/12/2020 रोजी रक्तदान शिबीर आयोजीत करावे, त्यात स्वंयस्फूर्तीने प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिकांनी व विद्यार्थी यांनी सहभागी व्हावे.

        दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा रक्तदान शिबीराचे महाविद्यालयांत आयोजन करण्यात आले आहे. रक्ताचा तुटवडा पाहता, दिनांक 21/12/2020 रोजी जास्तीत जास्त रक्तदान होईल अशी आशा आहे. महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबीर आयोजीत करतांना, सामाजीक अंतर पालन, विद्यार्थांची व नागरिकांची सुरक्षा, इत्यादी बाबीकडे विशेष लक्ष दिले जाणार.

      त्या अनुषंगाने दिनांक 21/12/2020 ला सकाळी 9:00 ते 4:00 वाजेपर्यंत चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा, चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभुर्णा, चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला आहे. तरी इच्छुकांनी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे नाव नोंदवावे असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.

1) नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे.
2) रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना महाविद्यालय कडून प्रमाणात देण्यात येतील.

रक्तदान शिबिर नोंदणीकरिता संपर्क साधावा.

1) प्रा. घोडेस्वार सर
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी
चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा
9422234503

2) डॉ, संघपाल नारनवरे 
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी 
चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा, 
9421806838, 9834874548

3) प्रा. डॉ. पाठक सर.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी
चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा
9456021310, 9960015562

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने