या विषयात सत्तेत असलेल्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे? अशी चर्चा तालुक्यात सुरु.
गोंडपिपरी:- मागील आठवड्यात पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका असल्यामुळे सर्व महसूल विभाग निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यामुळे याचा फायदा रेती तस्कर घेत होते. रेती तस्कराच्या अनेक तक्रारी तहसीलदारांना प्राप्त झाल्या होत्या, परंतु महसूल विभाग निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यामुळे याचा फायदा रेती तस्कर घेत होते. नुकतीच हिवरा घाटावर एक कोटीची कारवाई केल्यानंतर सदर तहसीलदारांनी आपला मोर्चा कुलथा घाटाकडे वळविला.
गोंडपिपरी तालुक्यात पसरले वाळू माफियांचे साम्राज्य.
कुलथा घाटाच्या अनेकदा तक्रारी तहसीलदार यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे काल रात्री नऊच्या सुमारास तहसीलदार यांनी कुलथा घाटाची पाहणी केली असता 8 ट्रॅक्टर सर्वे नंबर 115, 116, या जागेवर डम्पिंग करण्याच्या जागेवर रेती डम्पिंग करताना आढळून आल्या तर काही ट्रॅक्टर कुलथा घाटामध्ये आढळल्या. या सर्व बाबीची तहसीलदार महोदयांनी दखल घेऊन पोलिसांना पाचारण केले. सर्वांच्या समक्ष या टॅक्टरी जप्त करून तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आल्या आहेत.
सर्वे क्रमांक 215, 216, या जागेवर कोणाच्या आदेशाने हमाल डम्पिंग करण्यात येत होता. या सर्वे मालकावर तहसीलदार साहेब कोणती कारवाई करतात याकडे या परिसरातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. सदर कार्यवाही ही तालुक्यात सर्वात मोठी मानली जात आहे. सदर या विषयात सत्तेत असलेल्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. अशी चर्चा तालुक्यात सुरु आहे. या कारवाईमुळे अवैद्य रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.
अश्यातच गोंडपिपरी शहरात सध्या अवैद्य रेती तस्करांचे दोन गट निर्माण झाले असून अ गटांनी ब गटाच्या टॅक्टरी पकडून दिल्याची चर्चा रंगू लागली आहे. अ गटाला राजकीय नेत्याचा आशीर्वाद असून त्यामुळे ही कारवाई झाल्याची खमंग चर्चा संपूर्ण शहरात रंगू लागली आहे.