राजुरा पंचायत समितीचा स्तुत्य उपक्रम; १३० रक्तदात्यांनी केले रक्तदान.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- सध्या कोरोनासदृश परिस्थिती असल्याने रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. यासाठी राज्य सरकारने रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्ताचा पुरवठा करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले.याकरिता राजुरा पंचायत समितीने पुढाकार घेऊन रक्तदान शिबिर आज दिनांक १८ डिसेंबर २०२० ला सन्माननीय गटविकास अधिकारी डॉ.ओमप्रकाश रामावत साहेब यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती राजुरा येथील सर्व अस्थापनातील शासकीय कर्मचारी यांचा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये सर्व शिक्षक संघटनेने पुढाकार घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले त्याचसोबत इतर विभागातील कर्मचारी देखील सहभागी होऊन रक्तदान करण्यास सहमती दर्शविली.त्यात महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन शाखा राजुऱ्याचे पेंशन शिलेदार सुद्धा मोठया प्रमाणात सहभागी झालेत व रक्तदान करण्यात आले.
यावेळी तालुका सचिव सुधीर झाडे सर, श्रीकांत भोयर सर, जब्बार शेख सर, सिद्धेश्वर लटपटे सर,विठ्ठल मात्रे सर, दयानंद पवार सर, गिरीधर बोबडे सर, संजय बोभाटे सर, सी.आर. राठोड सर, धनराज उपासे सर, कृषी विभाग, ग्रामसेवक कर्मचारी, विविध आस्थापना कर्मचारी यांनी रक्तदानाला उस्फुर्त प्रतिसाद दिला या शिबिराला सन्माननीय राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी अधिकाधिक कर्मचाऱ्यांनी रक्तदान करण्यासाठी समोर यावे."रक्तदान हेच श्रेष्ठदान" असून रुग्णाचा जीव वाचविण्यात मोलाचा वाटा तुमचा असेल म्हणून रक्तदान करावे असे उदघाटन समारंभात बोलत होते.त्याचसोबत पंचायत समितीचे सर्वेसर्वा गटविकास अधिकारी आदरणीय रामावत साहेब यांनी देखील इतर तालुक्यात असेच रक्तदान शिबिर आयोजित करावे असा आशावाद निर्माण केला.सदरचे रक्तदान शिबिर हे जिल्ह्यासाठी व इतर तालुक्यासाठी आदर्शवत व दिशादर्शक ठरले आहे.