काव्यप्रेमी शिक्षक मंच चंद्रपूरची जिल्हा कार्यकारिणी गठीत

Bhairav Diwase
जिल्हाध्यक्षपदी प्रा.नीरज आत्राम तर सचिवपदी दुशांत निमकर यांची नियुक्ती.
Bhairav Diwase. Dec 10, 2020

चंद्रपूर:- काव्यप्रेमी शिक्षक मंच ही नोंदणीकृत साहित्य क्षेत्राला वाहिलेली संस्था आहे. महाराष्ट्रातील शिक्षक यांच्यातील सुप्तगुण, कलेला वाव देण्यासाठी अग्रेसर आहे. नवोदित कवी,लेखकांना प्रोत्साहन देऊन विचारपीठ निर्माण करण्याचा उदात्त हेतू आहे.शिक्षकांमध्ये असलेला कवीमन बाहेर काढण्याचे कार्य काव्यप्रेमी शिक्षक मंचद्वारे केल्या जाते.नुकताच किशोर चलाख यांची नागपूर विभागाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्ष पदी प्रा.नीरज आत्राम यांची निवड काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे राज्याध्यक्ष आनंद घोडके सर यांनी केलेली आहे.
            चंद्रपूर जिल्ह्यात काव्यप्रेमी शिक्षक मंचद्वारा साहित्य क्षेत्रात विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी गूगल मिट द्वारे ऑनलाईन सभा आयोजित करून जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी प्रा. नीरज आत्राम, उपाध्यक्ष नागेंद्र नेवारे, सचिव दुशांत निमकर, सहसचिव सुरेश गेडाम, कार्याध्यक्ष संतोष मेश्राम, महिला आघाडी प्रमुख सौ.संगीता बांबोळे, जिल्हा सल्लागार तथा मार्गदर्शक जयवंत वानखेडे आणि सदस्य म्हणून मालती सेमले मॅडम यांची निवड करण्यात आली आहे तरी सर्व स्तरातून जिल्हा कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात येत आहे.