भद्रावती:- येथील श्रीराम नगरमधील रहिवाशी डाॅ.रुपाली गायकवाड यांची चंद्रपूर जिल्हा वैद्यकीय सहायता विभागाच्या समन्वयकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेसच्या चिटणीस तथा वैद्यकीय सहायता विभागाच्या मुख्य समन्वयक डाॅ. वैष्णवी किराड यांनी केली. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.