Click Here...👇👇👇

दिल्लीच्या आंदोलनाला गोंडपिपरी यंग ब्रिगेड चा पाठिंबा.

Bhairav Diwase
कृषीविषयक कायदा रद्द करण्याची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या कृषी विषयक कायदा रद्द करा मागणीच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गोंडपीपरी यंग ब्रिगेड ने पाठिंबा दिलेला आहे.आंदोलक शेतकऱ्यांनी ८ डिसेंबर ला देशव्यापी बंदचे आयोजन केले आहे.

        शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून अन्यायी कृषी कायदे रद्द करन्याची मागणी तशीलदारांमार्फत पंतप्रधान यांना करत यंग ब्रिगेड ने भारत बंद ला पाठिंबा दिला.यावेळी यंग ब्रिगेड गोंडपीपरी चे संस्थापक अध्यक्ष सुरज माडूरवार संस्थापक, निकेश बोरकुटे तालुका कार्याध्यक्ष, गौरव घुबडे सोशल मिडीया प्रमुख, माजी उपसरपंच अमित फरकडे, तालुका सचिव प्रमोद दुर्गे, विठ्लवाडा अध्यक्ष संतोष उराडे, नभात सोनटक्के, नंदकिशोर बोरकुटे, प्रशांत कोसनकर, प्रतिक फलके, वैभव गिरसावळे,रितेश बट्टे, प्रदीप झाडे यांच्या सह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.