जि.प. चंद्रपूर समाजकल्याण अधिकारी यांना राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे निवेदन.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Dec 10, 2020
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हयातील जि.प,शाळा, सर्व अनुदानित/ विनाअनुदानित मान्यताप्राप्त शाळेतील इतर मागासवर्गीय व इतर विध्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या सर्व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे सन 2020/21 चे ऑफलाईन प्रस्ताव स्वीकारणे सुरु झाले असून सदर प्रस्ताव समाज कल्याण कार्यालयास दि 20/12/2020 पर्यंतच सादर करण्याच्या कार्यालायकडून सूचना दिल्या आहे, परंतु सध्यास्थितीत कोविड 19 परिस्थितीमुळे पालकांना उत्पन्नचा दाखला व मुलांचे बँक खाते मिळण्यास विलंब होत आहेे.

          त्यामुळे प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी दि 31/1/2021 पर्यंत वाढवून देण्यात यावा, जेणेकरून कोणताही विध्यार्थी सदर शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही, या प्रकारचे निवेदन देण्यात आले निवेदन देतांना श्री मनोज गौरकर श्री देवराव दिवसे, श्री प्रदीप पावडे, कु रजनी मोरे, पौर्णिमा मेहरकुरे, रेखा वंजारी, स्मिता अवचट, इत्यादी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ व राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महिला महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.