करोडो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेली प्राथमिक आरोग्य केंद्र (ईमारत) धुळ खात.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- माजी आमदार शोभाताई फडणविस सावली क्षेत्राच्या प्रतिनिधीत्व करत असताना मा दिनेश चिटनुलवार बाधकाम सभापती होते त्यावेळेश याच्या वाटा आणी सत्तत प्रयत्नाने सावली येथील प्राथमिक स्वस्थ आरोग्य केंद्र जिबगांव येथे सुरू करण्यात आले. सुरुवातीला येथील आरोग्य केंद्र दोन छोट्याशा रुमांमध्ये स्थलानंतर करण्यात आले होते. यासाठी सावली तालुक्याच्या ठिकानी असलेल्या उपरुग्णालयाचा मोठा वाटा राहीला होता. मात्र अनेक वर्षांपासून जिबगांव येथील प्रा. आरोग्य केंद्र अंगणवाडी ईमारतीच्या दोन छोट्याशा रुमांमध्ये स्थलांतर करण्यात आले. मात्र त्या ठिकानी वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी याना मोठ्या अडचणींचा सामना करून आरोग्य सेवा देताना दिसुन येत आहेत. तेव्हा सामाजीक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यानी माजी आमदार अतुल देशकर यानी सावली ब्रम्हपुरी क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत असताना जिबगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र च्या ईमारतीचे बांधकाम करण्यासाठी पाठपुरवठा केले असता माजी आमदार अतुल देशकर यानी दखल घेत जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचे सोबत स्वतः बसुन स्मशानभुमीची सात एकर जागे पैकी तिन एकर जागा प्रा.आरोग्य केंद्र साठी राखीव करून घेतली. त्यानंतर एक कोटी विस लाख रुपये नीधी मंजुर करण्यात आले होते.




पंरतु ती निधी इमारत बांधकामासाठी कमी पडत होती. त्यामुळे माजी आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री व अर्थ नियोजन व वने मंत्रीी(म.रा) असताना त्यांचेकडे सामाजीक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यानी पाठपुरावा केला असता अंदाजे तिन कोटी छेचाळीस लाख सत्ताविस हजार रुपये मंजूर करून घेण्यात आले. त्यानंतर आलेल्या निधी खर्च करून बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र आरोग्य सेवा मिळावी म्हणून ईमारती बांधकाम करण्यात आली. परंतु ईमारतीचे बांधकाम पुर्ण होऊनही ईमारत धुळ खात असल्याने ईमारतीचे लोकार्पण सोहळा पार पाडण्यात यावी व उत्तम सेवा मिळावी अशी मागणी होत आहे. अशातच जिबगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ईमारतीची पाहणी करण्यासाठी मा. माजी बाधकाम सभापती जिल्हा परीषद चंद्रपुर संतोषभाऊ तंगडपल्लीवार यांनी नुकतीच अधिकाऱ्यांसोबत भेट देत प्रा आरोग्य केंद्र च्या ईमारतीची पाहणी करीत जि. प अध्यक्षा व जिल्हाचे पालकमंत्री याचेशी चर्चा करून लवकरात लवकर इमारतीचे लोकार्पण करून आरोग्य सेवा सुरू करण्यात येईल असे सांगितले. सोबत गावातील सामाजीक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार तसेच प्रतिष्ठित नागरिक होते. इमारतीसाठी सामाजीक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यांनी केलेले कार्य प्रशंसनीय आहे. त्यांनी वेळोवेळी इमारत बांधकामासाठी निधीसाठी प्रत्येक वेळी पाठपुरावा करत राहिले.