(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा पत्रकार संघाचे वतीने स्वर्गीय शंकरराव देशमुख स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा इलेक्ट्रानिक्स मीडिया वार्तांकन हा नामांकित पुरस्कार लाईव्ह चंद्रपूरचे राजुरा प्रतिनिधी तथा सावली न्यूज चे उपसंपादक संतोष कुंदोजवार यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी पत्रकारिता सोबतच ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत जी प शाळा दत्तक घेऊन त्या शाळांना जिल्हा,विदर्भात पारितोषिक मिळवून दिला,डाक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण पुणे (बार्टी) च्या माध्यमातून 100 पेक्षा जास्त शाळा, महाविद्यालय, तथा गावात अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्त प्रबोधन सामाजिक समानता बाबत जनजागृती केली आहेत
राजुरा तालुका पत्रकार संघाचे वतीने दरवर्षी पत्रकार दिन कार्यक्रम साजरा केला जातो या कार्यक्रमात पत्रकारिता सोबतच सामाजिक प्रबोधन कार्य करणाऱ्या पत्रकाराचा सत्कार केला जातो यावर्षीही दिनांक 8 जानेवारी रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीही स्वर्गीय शंकरराव देशमुख स्मृती प्रित्यर्थ इलेक्ट्रानिक्स मीडिया वार्तांकन पुरस्कार संतोष कुंदोजवार, स्वर्गीय प्रभाकरराव मामुलकर स्मृती पुरस्कार देशोन्नती चे गणेश बेले, स्वर्गीय राघवेंद्र देशकर स्मृती ग्रामीण वार्ता पुरस्कार गडचांदूर येथील दैनिक लोकमत चे रत्नाकर चटप, स्वर्गीय सुरेंद्र डोहे स्मृति पुरस्कार गडचादूर येथील दैनिक सकाळचे सिद्धार्थ गोसावी, स्वर्गीय महियार गुडेवीया स्मृती पुरस्कार मसूद अहमद यांना जाहीर करण्यात आला आहे.
पत्रकार दिनाचे निमित्य होणाऱ्या 8 जानेवारी रोजी कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून खासदार बाळूभाऊ धानोरकर असून आमदार सुभाष धोटे हे अध्यक्ष स्थानी आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, माजी आमदार अडव्होकेत वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार अडव्होकेत संजय धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, उपाध्यक्ष सुनील देशपांडे, श्रीमती सुमनताई मामुलकर,उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरीश गाडे, अंबुजा सिमेंटचे मुख्य महाप्रबधक स्वप्नील रायकुंडलिया,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राधेश्याम अडानिया, वकील संघाचे अध्यक्ष अडव्होकेत निनाद येरणे हे उपस्थित राहणार आहे.