भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या निवेदनाची दखल.
चंद्रपूर:- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी शिष्टमंडळासह अजय गुल्हाणे जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना निवेदन देऊन घुग्घुस ग्रामपंचायतीची निवडणुक रद्द करून नगरपरिषदेची निवडणुक घ्यावी व घुग्घुस नगरपरिषदेची घोषणा करावी अशी मागणी काही दिवसापूर्वीच केली होती.
त्या अनुषंगाने नगर विकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. घुग्घुस ग्रामपंचायतीचे नगरपरिषदात रुपांतरण प्रस्तावित असल्याने ग्रामपंचायत निवडणुका न घेण्याबाबतचे पत्र स.ज.मोघे उपसचिव, नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठवले आहे.
एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगा कडु जाहीर करण्यात आला आहे. परंतु ग्रामपंचायत चे नगरपरिषदात रुपांतरणाची कारवाही नगर विकास विभाग महाराष्ट्र शासनात सुरू आहे. त्यामुळे राज्य निवडणुक आयोगाच्या कार्यक्रमानुसार ग्रामपंचायतीच्या आता निवडणुका झाल्या तर त्या नंतर नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी रुपांतरणाची कारवाही केल्यावर या ग्रामपंचायतीचे अस्तित्व संपुष्टात येईल व पुन्हा तेथे नव्याने स्थापित नागरी प्राधिकरणाच्या निवडणुका घ्याव्या लागतील. या निवडणुकांवर शासनाचा दुहेरी खर्च होनार. नव्याने निवडुण आलेल्या सरपंच व सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात आल्याने त्यांच्या कडुन प्रकरणे न्यायालयात दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. करीता घुग्घुस ग्रामपंचायतीच्या निवडणुका 3 महिण्याच्या कालावधी करीता पुढे ढकलण्यात याव्यात असे लिहिलेले पत्र नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठवले आहे.