ब्रम्हपुरी:- भारतरत्न, माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जयंती निमित्त ब्रम्हपुरी तालुक्यातील चिचखेडा येथे ब्रम्हपुरी युवा क्रिकेट क्लब चिचखेडा व अतुलभाऊ देशकर युवा मंच द्वारा आयोजित ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या “माजी आमदार चषक २०२१” क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती नागराज गेडाम यांच्या हस्ते व ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या वेळी विशेष अतिथी भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, जिल्हा महामंत्री तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कृष्णा सहारे, जिल्हा सचिव माणिक पाटील थेरकर, जेष्ठ नेते अरुण शेंडे उपस्थित होते.
निरोगी आरोग्यासाठी खेळ आणि व्यायाम हा मूल मंत्र असल्याचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. नागराज गेडाम यांनी खेळाडूंना प्रोत्साहित करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी मोठ्या स्थराची प्रतियोगीतेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आयोजक रामलाल दोनाडकर, प्रा. यशवंत आंबोरकर, तनय देशकर व चमुंचे अभिनंदन संजय गजपुरे यांनी केले. तर शिक्षणा सोबत खेळ सुद्धा आवश्यक असल्याचे क्रिष्णा सहारे यांनी सांगितले.
मागील २ वर्षांपासून चिचखेडा येथे माजी आमदार चषक क्रिकेट सपर्धेचे आयोजन करण्यात येते. या वर्षीच हे तिसरं वर्ष आहे. या वर्षी स्पर्धेत एकूण 53 संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील विजेत्या संघाला स्व. शांतताई देशकर स्मृती प्रित्यर्थ २१,००० रु रोख व चषक, उपविजेत्या संघाला जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती नागराज गेडाम यांच्या वतीने १५,००० रु रोख व चषक तर तृतीय क्रमांक वर असलेल्या संघाला स्व. बेबीताई पेंढरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ९,००० रु रोख व चषक मिळणार आहे. या स्पर्धेत एकूण ६१,००० रूपयांचे बक्षिसे देण्यात येणार आहेत.
ब्रम्हपुरी तालुक्यातच न्हवे तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ही बहू चर्चित व लोकप्रिय स्पर्धा आहे. या वर्षी चंद्रपूर, गडचिरोली यांच्या सह गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील संघ सहभागी झाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वतीने विशेष नियम ठरविण्यात आले आहेत. खेळायला येणाऱ्या प्रत्येक खेळाडूची स्क्रिनिंग सहित ऑक्सिजन लेव्हल ची तपासणी करण्यात येत आहे. सोबतच गावातील प्रेक्षकांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था असुन बाहेर गावाहून येणाऱ्या खेळाडूंसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. सॅनिटीझरचा वापर सुद्धा वेळोवेळी करण्यात येत असून सर्व खेळाडूंची नोंद करण्यात येत आहे.
या उद्घाटन प्रसंगी पंचायत समितीचे सभापती प्रा.रामलाल दोनाडकर, उपसभापती सौ. सुनीता ठवकर, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. वंदना शेंडे, माजी जि.प सदस्य काशीनाथ थेरकर, पंचायत समिती सदस्य नीलकंठ मानापुरे, युवा नेते प्रा.यशवंत आंबोरकर, शहर कोषाध्यक्ष अरविंद नंदूरकर, साकेत भानारकर, युवा नेते रितेश अलमस्त,भाजपा जिल्हा कार्यकरिणी सदस्य ज्ञानेश्वर भोयर, युवा नेते ज्ञानेश्वर दिवठे, राजेश्वर मगरे, राजेंद्र आंबोरकर, मनीष मानापुरे, धीरज पाल, मुकेश झंजाळ, अंतराम मोहूर्ले, भाऊराव ठवकर यांच्या सह तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्याचे प्रस्ताविक भा.ज.यु.मो जिल्हा सचिव तथा आयोजक तनय देशकर यांनी तर संचलन आयोजन समितीचे सदस्य अविनाश मस्के यांनी केले. आभार आयोजक तथा पं.स सभापती रामलाल दोनाडकर यांनी मानले.