निबंध स्पर्धेत राकेश हासे प्रथम.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.   Dec 03, 2020
पोंभुर्णा:- जनता विद्यालय गोंडपिपरी तर्फे संविधान दिनानिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आली. 'भारतीय संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर पार पडलेल्या निबंध स्पर्धेत आदर्श ग्राम घाटकुळ येथील राकेश अनिल हासे या विद्यार्थ्याने प्रथम पारितोषिक पटकावले. राकेशला वाचन, लेखन व वकृत्वाची आवड असून आतंरराष्ट्रीय स्तरावर दखल झालेल्या घाटकुळ येथील बालपंचायतीचा तो उपसरपंच. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल राकेशचे शिक्षकवृंद व गावकऱ्यांनी कौतुक केले.