कोष्टाळा शाळेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन‌.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा पंचायत समिती मधील जि प उ प्राथ शाळा कोष्टाला येथे क्रांतिसूर्य , थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 
               कार्यक्रमाच्या सुरवातीला शाळेतील उपक्रमशिल शिक्षक वृक्षप्रेमी श्री . भास्कर सर, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. प्रकाश कुंदाराम व गावातील प्रतिष्ठित नागरिक बोटपल्ले यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून त्यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री भास्कर सर यांनी केले, असे उपक्रमशील शिक्षक, वृक्षप्रेमी भास्कर सर कळवितात.