वाढदिवसानिमित आ. शरदचंद्रजी पवार साहेब साधणार जनतेशी थेट संवाद.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- दि. १० डिसेंबर २०२० रोज गुरवारला दुपारी 2:00 वाजता स्वयंवर मंगल कार्यालय राजुरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका राजुराच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.
        
      त्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब अनेक तालुक्यातील कार्यकर्ते व जनतेशी ( वर्चुअल रॅली- व्हिडिओच्या माध्यमातून ) थेट संवाद साधणार असून सदर कार्यक्रम दि. १२ डिसेंबर २०२० रोज शनिवारला स. १०:०० ते दु. २:०० पर्यंत स्वयंवर मंगल कार्यालय राजुरा येथे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त वरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 
           
    त्याप्रसंगी राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष मा. मेहमूद मुसा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मा. संतोष देरकर, शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष असिफ सय्यद, महिला शहर अध्यक्ष अर्चनाताई ददगाळ, स्वप्नील बाजूजवार, रखीबभाई शेख, संदीप पोगला, राजू ददगाळ, अंकुश भोंगळे, सुजीत कावळे आदी उपस्थित होते तसेच सदर बैठक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राजुरातील पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली. 
    
    तालुक्यातील कार्यकर्ते व जनतेनी या कार्यक्रमास आपली उपस्थिती दर्शवावी अशाप्रकारची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष देरकर यांनी केली आहे. कार्यक्रमानंतर लगेच भोजनाचा कार्यक्रमाला सुरवात होत असल्याचे त्यांनी सांगितले.