सिंदेवाही पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन.

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन आज दिनांक 31/12/2020 रोजी तांबे गडी मेंढा टि पाइंट याठिकाणी इसम नामे गणेश मेश्राम हा त्याचे स्वतःचे मोटारसायकल वरून रस्त्याचे शेजारी जखमी अवस्थेत पडून होता.

    त्याच दरम्यान सिंदेवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक योगेश घारे, रणधीर मदारे वाहन चालक शेंडे असे ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने तांबे गडी मेंढा येथील बुथ तपासणी करून चालले असताना त्यांचे निदर्शनास सदरची बाब आली. पोलीस निरीक्षक योगेश घारे व त्यांचे सहकारी यांनी तात्काळ गाडीतून खाली उतरून सदर जखमी इसमास स्वतःचे गाडीमध्ये भरून लागलीच सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय येथे आणून भरती केले . सदर इसम गंभीर जखमी असल्यामुळे त्याला तात्काळ उपचार मिळाले त्यामुळे सदर इसमाचे प्राण वाचले आहेत. गणेश मेश्राम यांच्या कुटुंबातील लोकांनी पोलिसांचे आभार मानले आहे तसेच स्थानिक नागरिकांनी देखील पोलिसांचे कौतुक केले आहे.