दरवर्षी नववर्षाच्या पहिल्या दिवशी पहिला रक्तदाता मनोज तेलिवार.

रक्तदानाची ह्यट्रिक.

यापूर्वी बारावेळा केले आहे गरजूना रक्तदान.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- रक्तदान श्रेष्ठदान हे आपण नेहमी ऐकत व बघत आलो आहे. आपल्या केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. त्यामुळे न चुकता दरवर्षी नववर्षाच्या पहिल्या दिवशी पहिला रक्तदाता म्हणून मनोज प्रकाश तेलिवार हा राजुरा येथील युवक रक्तदान करतो. हे त्याचे सलग तीसरे वर्ष ठरले.

      नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था राजुरा तालुका संघटक म्हणून नेहमी पर्यावरण व मानवता विकासात्मक सामाजिक उपक्रमात हिरिरीने सहभागी होणारा मनोज दरवर्षी न चुकता पहिला रक्तदाता म्हणून रक्तदान करतो. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या रक्तकेंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथे तो स्वतः जाऊन रक्तदान करतो. मनोजने यापूर्वीही बारा वेळा गरजूना रक्तदिले आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण पंधरा वेळा त्याने रक्त देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कोविड -19 सारख्या महाभयंकर जागतिक महामारीने संपूर्ण जग घाबरलेले असतांना मात्र मनोज सारखा तरुण नववर्षांचे स्वागत हे रक्तदान करून एक सकारात्मक प्रेरणा ठरत आहे. मनोज च्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस ,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दीपक भवर, नागपूर विभाग अध्यक्ष प्रा. प्रोफेसर बहेकार ,नागपूर विभाग सचिव बादल बेले, तसेच महिला अध्यक्ष आचल राऊत ,उपाध्यक्ष तेजस्वनि नागोसे, चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष ललिता मुस्कावार ,जिल्हासंघटक विजय जांभूळकर , राजुरा तालुका अध्यक्ष संतोष देरकर ,अल्का सदावर्ते आदींसह अनेक मान्यवरांनि मनोजचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या