(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार यांच्या संकल्पनेतून नवीन वर्षाचे स्वागत केक वाटून करण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
रात्री नवीन वर्षाची सुरुवात होताच येथील चंद्रपूर-नागपूर महामार्गावर ट्रक चालक आणि रात्री प्रवास करणारे प्रवाशी यांना स्वत: पोलिस निरीक्षक पवार आणि अंमलदार यांनी केक वाटून व शुभेच्छा देऊन नवीन वर्षाचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत केले.
एकीकडे डीजेच्या तालावर नाचून आणि मद्य प्राशन करुन हलकल्लोळ माजविणा-या तरुणाईसाठी भद्रावती पोलिसांचा हा उपक्रम बोध घेण्यासारखा असल्याचे सुज्ञ नागरिकांत बोलले जात आहे.