प्रहारकडुन एक फोन आणी तात्काळ 1लाख 17 हजार रुपये माफ.
नागपूर:- नागपुर येथील रामदास पेठेतील मेडिट्रीना हाँस्पीटल येथे काल दि.31/12/2020 रोजी चंद्रपुर येथील रहिवाशी सौ. मंगल कामतकर यांचा कोरोणामुळे मृत्य झाला, तेव्हा हाँस्पीटलने त्यांचे बिल 1 लाख 97 हजार रुपये काढले.
तेव्हा आज दि.01/01/2021 रोजी मयत महिलांचे नातेवाईक नितीनभाऊ कुमरे यांनी तात्काळ प्रहार जनशक्ती पक्षाचे पुर्व विदर्भप्रमुख रुग्णमीत्र श्री. गजुभाऊ कुबडे यांना हा प्रकार सांगीतला असता , तात्काळ रुग्णमीत्र श्री.गजुभाऊ कुबडे यांनी मेडिट्रीना हाँस्पीटल च्या डाँक्टरांशी संपर्क करत त्या डाँक्टरांना धारेवर धरत बिल कमी करण्याचे सांगीतले असता , तात्काळ 1लाख 17 हजार रुपये मेडिट्रीना हाँस्पीटल कडुन माफ करण्यात आले.
अशा दुखाच्या प्रसंगी ही हाँस्पीटल कडुन लुटमार होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.