महीलांच्या आर्थिक उन्नतीमधे बचत गटाचे महत्व या विषयांवर मार्गदर्शन.
फूलझाडानी केले महिलांनी हळदी कुंकू साजरे.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- मकरसंक्रांतीचे निमित्त साधून तेली समाज महिला मंडळाकडून महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. संताजी सभागृह गडचांदुर रोड, सास्त्ती टी पॉईंट ,रामपूर- राजुरा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून चंदाताई मनोज वैरागडे, अध्यक्षा ,विदर्भ तेली समाज महासंघ ,चंद्रपुर शहर यांची उपस्थिति होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून निता मारोतराव येरणे यांची प्रामुख्याने उपस्थित होती.तर प्रमुख अतिथि म्हणून वंदना खेडकर , शारदा देविदास टिपले ,नगरसेविका न.प.राजुरा यांची उपस्थिती होती. यात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आपल्या कलांना उजागर केले. उपस्थित महिलांना हळदीकुंकू करून फूल झाडान्चे वाटप करण्यात आले.
महिलांनी सामाजिक कार्यक्रमातून प्रगती साधून स्वावलंबी व्हावे. समाजहिताचे व देशाच्या कार्यात आपले योगदान द्यावे तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी कुठल्याही कामाची लाज बाडगू नका. महिला बचत गटाच्यामाध्यमातून महिला सक्षमीकरन होत असून त्यातून महिलांनी प्रगती केली असे प्रतिपादन वैरागडे यांनी केले. आज महिलांनी ठरवलं तर काहीही साध्य करता येऊ शकते, याचा आपल्या सर्वांना अनुभव आहे. त्यामुळं महिलांनी अशा कार्यक्रमातुन पुढे येण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरान्नी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
हळदी कुंकू कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेली समाज महिला मंडळानी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वृशाली देवेंद्र घटे यांनी केले. प्रास्तावीक शीतल किशोर पडोळे व आभार जयश्री मनिष मंगरूळकर यांनी मानले.