नापिकीमुळे युवा शेतकऱ्याची आत्महत्या.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील पाचगाव येथील युवा शेतकरी शंकर वारलू बोरकुटे, वय ४१ याने आपल्या शेतात विष प्राशन करून आपल्या शेतात आत्महत्या केली. आज गुरुवारला सकाळी नऊ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. 

   मृतक शंकर यांचे वडिलांचे नावावर सहा एकर शेती असून वडिलांचे नावे बँकेचे कर्ज आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व सतत होणार्‍या नापिकीला कंटाळून त्याने आपली जिवनयात्रा संपविली. त्यांचे मागे पत्नी,एक मुलगा व एक मुलगी, आई, वडील व मोठा आप्तपरिवार आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.