धावत्या कारने घेतला अचानक पेट.....

Bhairav Diwase
 Bhairav Diwase.    Jan 22, 2021
(संग्रहित छायाचित्र)
ब्रह्मपुरी:- रस्त्यावर धावत असलेल्या कारने अचानक पेट घेतल्याने कार पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान ब्रह्मपुरी-नागभीड राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ घडली.

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागपूर येथील रहिवासी असलेले सतीश पोडल्लीवार (३५) हे आपल्या आई, वडील व मुलासह गडचिरोली येथे तीर्थक्षेत्रावर दर्शन घेण्यासाठी कारने गेले होते. दर्शन घेऊन परत नागपूरला जात असताना ब्रह्मपुरी- नागभीड राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ एम.एच. ३४ के ८४७७ क्रमांकाची कार अचानक बंद पडली. तेव्हा कार चालवीत असलेल्या सतीश पोडल्लीवार यांनी कार रस्त्याच्या कडेला लावली.

तेव्हा कारच्या इंजिनमधुन अचानक धूर बाहेर यायला लागला. कारमध्ये बसलेले सर्व जण कारमधून खाली उतरले. त्यानंतर अचानक कारने पेट घेतला. त्यामध्ये कार जळून पुर्णतः खाक झाली. त्यानंतर अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले.