चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती "पराक्रम दिवस" म्हणून साजरी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Jan 24, 2021
पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा येथे दि. 23/01/2021 ला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती "पराक्रम दिवस" म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कॉलेजचे प्राचार्य डॉ. टि. एफ गुल्हाणे होते. यावेळी प्राचार्य डॉ टि. एफ गुल्हाणे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जिवन चारित्र्यावर बोलताना म्हटले कि, इंग्रजांविरोधातील भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामा बाबतचा इतिहास आठवताना एक नाव न विसरता घेतलं जातं. ते नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. 'तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा' असा नारा देत देशप्रेमासाठी स्वत:ला झोकून दिलेल्या नेताजींनी देशातील तरुणाईमध्ये देशप्रेमाची भावना अशी काही जागृत केली की, पाहता पाहता सबंध तरुणाई एकाच ध्येय्यानं व्यापली.

   यावेळी कार्यक्रमाला प्रा. नितीन उपर्वट, प्रा. ओमप्रकाश सोनोने प्रा. डॉ पुर्णिमा मेश्राम, डॉ. संघपाल नारनवरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.