कोरोना योध्यांचा प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री यांचे हस्ते सत्कार.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:-  कोरोना संक्रमण काळात जिवाची पर्वा न करता कर्तव्यदक्ष  भारत विकास ग्रुप 108 चे रुग्नवाहिका व ऑपरेशन हेड  उपविभागीय अधिकारी श्री डॉ,प्रशांत घाटे साहेब, जिल्हा व्यवस्थापक डॉ. चेतन कोरडे साहेब,डॉ अभिजीत उगले,डॉ, दीपक मोरे,डॉ, अमित दोडके, डॉ, नितिन भैसारे आणि जिल्हा चंद्रपुर/गड़चिरोली समस्त पायलट वर्ग यांना प्रशस्तीपत्र देऊन पुढील वाटचाली करिता जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी शुभेच्छा दिल्या,
    कोरोना अर्थात कोविड १९  या संक्रमण काळात जिल्हा प्रशासनाला श्री माननीय दीपककुमार ऊकेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाला योगदान दिल्याबद्दल उपाययोजना करतांना दिलेले योगदान अतुलनीय आहे. सामाजिक जाणिव ठेऊन जोखीम उचलत केलेल्या अमूल्य कार्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली. आपल्या वैविध्यपूर्ण, उपक्रमशील आणि प्रशासनाला उपयोगी ठरलेल्या मौलिक कार्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री मा.श्री.विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते २६ जानेवारी प्रजासत्ताक दीनानिमित्ताने प्रशस्तीपत्र देऊनसन्मानित करण्यात आले.
          108 चे सर्व कर्मचारी हे जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत होते या सत्कारामुळे सर्व कर्मचाऱ्यांना एक नवी ऊर्जा प्राप्त झाल्याचे प्रतिपादन 108 रुग्णवाहिका चालक खुशाल लकडे यांनी केले.