नागपूर:- काही दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये प्रेयसीसोबत सेक्स करताना एका तरुणाचा गळफास लागून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून घेत घटनेच्या वेळी त्याच्यासोबत खोलीत असणाऱ्या त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे. मृत तरुणाच्या वडिलांनी आपल्या मुलाचा खून झाल्याची तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
अशी घडली घटना......
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा भागातल्या एका हॉटेलमध्ये ही घटना चार दिवसांपूर्वी घडली. मृत तरूण हा इंजिनियर होता. त्याचे त्याच्या प्रेयसीशी पाच वर्षांपासून संबंध होते. या दोघांनी या हॉटेलमध्ये एक खोली आरक्षित केली होती. तिथे गेल्यावर दोघांनी सेक्स केला आणि यावेळी काहीतरी नवे करण्याचा विचार या तरुणाच्या मनात आला. त्याने हा विचार त्याच्या गर्लफ्रेंडला सांगताच तिनेही संमती दिली. तिने दोरीने या तरुणाचे हातपाय खुर्चीला बांधले आणि नंतर गळ्याभोवतीही दोरी गुंडाळली. थोड्या वेळाने ती स्वच्छतागृहात गेली, मात्र खुर्चीवर बांधलेल्या अवस्थेत असलेला तरुण गळ्याभोवतीचा फास आवळला जाऊन खाली कोसळला आणि तरुणी परतेपर्यंत त्याचा मृत्यू झाला.
आधी झाली अकस्मात मृत्यूची नोंद......
तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रेयसीने लगेच झाल्या प्रकारामची माहिती हॉटेलच्या व्यवस्थापकांना दिली. पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि त्यांनी प्राथमिक माहितीच्या आधारे बांधलेल्या दोरीने गळा आवळला गेल्याचा निष्कर्ष काढत अकस्मात मृत्यू म्हणून प्रकरणाची नोंद करून घेतली.
मृत मुलाच्या वडिलांनी केला हत्येचा आरोप.....
मात्र मृत मुलाच्या वडिलांनी आपल्या मुलाची हत्या झाली असल्याचा आरोप करत नागपूर पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा आरोप नोंदवून घेत घटनेच्या वेळी मृत तरुणासोबत हजर असलेल्या त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे.