(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
राजुरा:- श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे राष्ट्रीय युवा दिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे "राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांचे योगदान" या विषयावर आभासी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ. चिन्मय कुमार रॉय, (वाणिज्य विभाग, बनारस हिंदू विश्वविद्यालय, वाराणसी) हे लाभलेले होते, त्यांनी आपल्या व्याख्यानातून स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटावर विस्तृत विवेचन करतांना, स्वामी विवेकानंदाच्या एकूण कार्यावर प्रकाश टाकला, भारतीय संस्कृती साठी अंधकार युग असतानाही स्वामीजींनी भारतीय समाजाला पर्यायी युवकांना जागृत करून भारतीय संस्कृती ची श्रीमंती व प्राचीनत्व सांगून आपल्या देशातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य केले असे प्रतिपादन यावेळी डॉ. रॉय यांनी केले.
आजच्या युगातील युवकाची जबाबदारी सांगत असतानाच युवकांनी पुढे येऊन प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवायला हवा असा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणातून केला.
यावेळी भारतातील विविध विद्यापीठातील स्वयंसेवक, विद्यार्थी जडलेले होते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. वारकड, विशेष उपस्थिती डॉ. शरद बेलोरकर,तसेच उपप्राचार्य डॉ. खेराणी, कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बलकी, डॉ. सारिका साबळे, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन फिझा शेख तर आभार श्रीनिवास अजमेरा यांनी केले.