स्वामी विवेकानंदांचे विचार विशिष्ठ धर्म जातीच्या चौकटीत बंदिस्त करता येणारे नाहीत:- प्रशांत आर्वेच आहे

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा येथील शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिवसानिमित्त वनस्पतीशास्त्र व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने "योद्धा संन्याशी: स्वामी विवेकानंद" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, या व्याख्यानाला प्रमुख वक्ते म्हणून प्रशांत आर्वे हे लाभलेले होते, त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटावर विस्तृत विवेचन करतांना, त्यामध्ये स्वामी विवेकानंदाचे कार्य हे अनेक बाजूने महत्वपूर्ण असून त्यांना विशिष्ट धर्म, जाती, संप्रदायाच्या चौकटीमध्ये बंदीस्त करता येणार नाही असे भाष्य केले. कोलंबो ते अलमोरा प्रवासात स्वामीजींनी केलेल्या भाषणाचा उल्लेख करताना स्वामीजींच्या विदेश दौऱ्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. सोबतच आजच्या युगात अंतर्मुख होऊन स्वमूल्यांकन करत राष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वानी बांधील असायला हवे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी वरकड, तसेच प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य वरीष्ठ विभाग डॉ.राजेश खेराणी, कनिष्ठ विभाग उपप्राचार्य प्राध्यापक बारई, IQAC समन्वयक डॉ. मल्लेश रेड्डी, वनस्पती शास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक एस. तुम्मावार, इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक गुरुदास बलकी, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.