भद्रावती तालुक्यातील रुग्णलयांची व नर्सिंग होमची तपासणी करा.

Bhairav Diwase
भिम आर्मीचे तहसीलदारांना निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यात तथा शहरात रुग्णालय तथा नर्सिंग होमची संख्या मोठी असून यापैकी काही रुग्णालये तथा नर्सिंग होम मध्ये आवश्यक त्या सुविधांचा तथा काही रुग्णालये अनधिकृत असल्याची शंका व्यक्त करीत तालुक्यातील तथा शहरातील रुग्णालये तथा नर्सिंग होमची शासकीय स्तरावर तपासणी करून त्यात दोष आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी 
        भद्रावती येथील भिम आर्मी भारत एकता मिशन व्दारे येथील तहसीलदारांना देण्यात आलेल्या एका निवेदनातून करण्यात आले आहे.
              सदर निवेदन भिम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष शंकर मुन यांच्या नेतृत्वात येथील तहसीलदारांना सादर करण्यात आले. यावेळी भिम आर्मीचे तालुका प्रमुख मिलिंद शेंडे,  तालुका उपप्रमुख शेख अन्वर,शहर प्रमुख सिद्धार्थ बिरचुंडे, तालुका सदस्य दासू मानकर, अतुल पाटील, प्रणय दारव्हेकर, गोकुल गवई, विजय श्रीवास, रतन पेटकर, नितीन देवगडे, राजेंद्र ढोक, बादशाह कुरेशी, रमेश भासारकर, अमोल चालखूरे, आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.