महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लावलेल्या अटी रद्द करा.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत दि. 30/12/2020 रोजी करण्यात आलेल्या घोषणेनुसार एम पी एस सी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना कमाल अटीची घळण्यात आलेली अट रद्द करण्यात यावी यासाठी आज दि. १४/०१/२०२१ रोजी मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे यांना एक निवेदन पाठविण्यात आले आहे. एम पी एस सी विद्यार्थ्यांच्या वतीने मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी या निवेदनाची प्रत राजुरा येथील उपविभागीय अधिकारी श्री संपत खलाटे यांना दिली आहे.
            एम पी एस सी परिक्षाला बसण्याकरिता खुला पवर्ग व ओबीसी करीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहा व नऊ संधीची लावलेली अट या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जाचक व अन्यायकारक आहे. आधी वयोमर्यादेची अट असतांना कमाल संधीची अट घालणे म्हणजे खुला प्रवर्ग व ओबीसी मुख्य प्रवाहातून बाहेर काढणारी आहे त्यामुळे या प्रवर्गामध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली असल्याने ही अट रद्द करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली.
                  भारतीय संविधानामध्ये कलम १६ चे हे उल्लघन असल्याचे मत व्यक्त करून हा नियम गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना मारक ठरणारा आहे. या नियमामुळे गरीब व होतकरू मुले एम पी एस सी परिक्षेपासून वंचित राहील महाराष्ट्र शासनाने वेळीच संधी विषयक अटी रद्द करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अन्यथा कलम २२६ नुसार मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मिळवून घेईल अशा इशारा राज्य प्रवक्ता श्री राम एस इंगळे यांनी राजुरा येथे पत्रकार परिषद घेऊन दिले आहे या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानचे श्री. राम एस. इंगळे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर जाधव, अरुण पर्वतवार, अभिजित टेकाम, गोपाल दैन्नेकर यांची उपस्थिती होती.