पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा राष्ट्रीय सेवा योजना विभागा तसेच अंतर्गत तक्रार निवारण समिती तर्फे प्रत्येक महिन्याचा नाजूक त्या चार दिवसांतील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने तिन वर्षापासून दत्तक घेतलेल्या आष्टा गावात आज दिनांक 16/01/2021 ला सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यात आले.
अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या प्रमुख प्रा डॉ पुर्णिमा मेश्राम यांनी सॅनिटरी नॅपकिनचे महत्व पटवून दिले. तसेच उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका मंदाताई अशोक येरमे व सौ. रोहीणी हरीष ढवस यांनी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला. या कार्यक्रमाला गावातील 10 महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला करीता काॅलेजचे प्राचार्य डॉ. टि. एफ गुल्हाणे यांनी कार्यक्रमांच्या आयोजनाला शुभेच्छा दिल्या. डॉ. संघपाल नारनवरे, प्रा. नितीन उपर्वट, प्रा ओमप्रकाश सोनोने यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रा विजय बुधे, तसेच राहुल सुर्यतळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.