पत्रकार घडविणारे, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते जेष्ठ पत्रकार रामदासजी रायपुरे यांचं निधन.

Bhairav Diwase
वृतस्थ पत्रकार हरपला : आ. सुधीर मुनगंटीवार.
Bhairav Diwase. Jan 16, 2021
चंद्रपूर:- जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातील जेष्ठ पत्रकार, दैनिक चंद्रपूर समाचार चे संस्थापक रामदासजी रायपुरे यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.

    चंद्रपूर येथील ज्येष्ठ पत्रकार, दैनिक चंद्रपूर समाचारचे संपादक तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष रामदास रायपूरे यांचे शुक्रवारी रात्री 09:10 वाजता निधन झाले. ते 91 वर्षाचे होते. त्यांची अंत्ययात्रा शनिवार दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता त्यांचे राहते घर चंद्रपूर समाचार भवन, जटपूरा गेट येथून शांतीधाम येथे निघणार आहे.

वृतस्थ पत्रकार हरपला : आ. सुधीर मुनगंटीवार.

दैनिक चंद्रपूर समाचारचे संस्थापक संपादक श्री रामदासजी रायपूरे काका यांच्या निधनाने एक व्रतस्थ पत्रकार हरपल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
रायपुरे काकांनी दीर्घकाळ पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जपत चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. अनेक सामाजिक संस्था व संघटनांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आंबेडकरी चळवळीत सुद्धा ते सक्रिय होते. ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला. त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्यातील व्रतस्थ पत्रकार हरपला असून सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

आधार न्यूज नेटवर्क परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐 💐💐💐