(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील ग्रंथपाल डॉ सारिका साबळे यांनी मकरसंक्रांतिचे औचित्य साधून महिलाना विविध प्रकारच्या वस्तू वाण म्हणून भेट न देता हळदीकुंकू चा कार्यक्रम आयोजित करून त्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी.
त्यातून ज्ञानात भर पडावी यासाठी महिलांना पुस्तके देऊन वाचन संस्कृती ला चालना देण्याचा प्रयत्न करून एक वेगळा उपक्रम राबवीला, थोर महिला व्यक्तिमत्त्वाची चरित्र वाचून कुटुंबातील लहान मुलं मुली यातून प्रेरित होतील आणि त्यातून प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील मुले व मुली मध्ये वाचनाची आवड निर्माण होईल, आणि त्यातून राष्ट्र निर्मितीचे कार्य घडेल यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. आज वाचन संस्कृती विकास करण्यासाठी अशा विविध उपक्रमांची आवश्यकता आहे जेणेकरून वाचनाची आवड निर्माण होईल यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे असे डॉ. साबळे यांनी सांगितले.