(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन तालुक्यातील माजरी पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र्र पोलिस वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला.
स्थानिक कर्मवीर विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींना शिक्षिकांसह पोलिस स्टेशनला बोलावून पोलिस स्टेशनच्या कामकाजाविषयी माहिती देण्यात आली. तसेच त्यांना महिला नायक पोलिस शिपाई निता यांनी लैंगिक अपराधाविषयी माहिती दिली.यावेळी पोलिस स्टेशनच्या आवारात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली व विजेत्यांना विविध पुस्तके भेट देण्यात आली.