ग्राम पंचायत मंगी ( बु ) हे ठरतेय विकासाचे प्रेरणादायी मॉडेल.

Bhairav Diwase
कवठाळा, येकोडी, भोयगाव व नांदगाव सुर्याचा या गावातील सरपंच व गटप्रमुख शेतकरी यांचा मंगी (बु) येथे अभ्यास दौरा.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील ग्राम पंचायत , मंगी (बु.) हे एक विकासाचे प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. ही बाब ग्रामस्थांना जाणवू लागली. मंगी (बु.) गावाच्या विकास कामाचा अभ्यास करण्यासाठी अंबुजा सिमेंट फाउन्डेशनच्या माध्यमातून कवठाळा, येकोडी, भोयेगाव व नांदगाव सुर्याचा या गावातील सरपंच आणि गटप्रमुख शेतकरी यांनी मंगी (बु) येथे भेट देवून गावाच्या श्रमदानाची व विकास कामाची पाहणी केली. ग्राम पंचायत सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ग्राम पंचायतचे सरपंच सौ. रसिकाताई पेंदोर, उपसरपंच श्री. वासुदेवजी चापले, अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे व्यवस्थापक श्री. श्रीकांतजी कुंभारे, श्री. जितेंद्र बैस, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष श्री. परशुराम तोडासाम ( मुख्याध्यापक मंगी खु ), शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अंबादासजी जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाशजी वेडमे, माजी जि.प.सदस्य श्री. भिमरावजी पुसाम, पोलीस पाटील श्री. व्यंकटराव मुंडे, ग्रा.पं.सदस्य श्री. शंकर तोडासे, श्रीमती सोनबत्तीताई मडावी, ग्रामस्थ श्री. संभाजी पा. लांडे, श्री. गणपतजी चापले, ग्रा.पं. सचिव श्री. गजानन वंजारे यांचे प्रमुख उपस्थितीत कवठाळा, येकोडी, भोयेगाव व नांदगाव सुर्याचा या गावातील सरपंच आणि सदस्य यांची बैठक घेण्यात आली. उपसरपंच श्री. वासुदेवजी चापले, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष श्री. परशुराम तोडासाम, यांनी स्मार्ट ग्राम तयार होण्याचा प्रवास कसा झाला हे सांगताना सन 2012 पासून ग्रामस्थ व युवकांनी सातत्याने दररोज पहाटे 5 वाजता पासून 2 तास ग्राम स्वच्छतेसाठी श्रमदान करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर अभ्यास दौऱ्यातून पाहणी करतांना स्वच्छता पाहून तर भाराहून गेले आणि संपूर्ण गावाचे कौतुक केले. पाहणी करताना दृष्यस्वरुपात गावातील नालीमुक्त पण शोषखडडेयुक्त गाव, स्वच्छ असलेले रोड, सुंदर व मनमोहक बगीचा, सौंदर्यात्मक प्रवेशव्दार, गावाची सातत्याने होणारी स्वच्छता, गावाच्या बाहेरील रोडची श्रमदानातून होणारी स्वच्छता, 850 वृक्षांचे वृक्षारोपन व संवर्धन, शालेय परिसर स्वच्छ, शाळा बंद पण शिक्षण सुरु उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी, 100 टक्के करवसुलीचे प्रयत्न , युवक - युवतीसाठी विविध स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने प्रशिक्षण वर्ग, ग्रामपंचायत, शाळा व अंगणवाडी ISO होण्यासाठीचे नियोजन इत्यादी नाविण्यपूर्ण उपक्रम दाखविण्यात आले. या कार्यक्रमाचे संचलन मुख्याध्यापक श्री. रत्नाकर भेंडे यांनी केले तर आभार ग्रा.पं.चे सचिव श्री. गजानन वंजारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. नितीन मरस्कोल्हे, श्री. चरणदास चिलकुलवार, श्री. वसंत सोयाम, श्री. सुरेश येमुलवार, श्री. नवनाथ जाधव आणि श्री. किसन कोडापे तसेच गावातील युवक युवती यांनी मोलाचे सहकार्य केले.