राजुरा:- श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हा उद्योग केंद्र चंद्रपूर, ग्रंथालय विभाग व राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या संयुक्त विद्यमाने "महिला बचत गटामार्फत उद्योग निर्मिती" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, या व्याख्यानाला प्रमुख वक्त्या म्हणून वैशाली एस. सटाले, बालविकास प्रकल्प अधिकारी राजुरा, या लाभलेले होत्या.
त्यांनी आपल्या मार्गदर्शनात ग्रामीण भागातील महिलांनी बचत गट स्थापन करून त्यातून गावाचा विकास साधता येईल, सोबत बचतीची चांगली सवय लागेल आणि त्यातून छोटे मोठे उद्योग निर्मिती करून राष्ट्राच्या विकासात योगदान देता येईल, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. खेराणी, तसेच प्रमुख उपस्थिती सौ. गीता रोहोणे नगर सेविका, समन्वयक डॉ. मल्लेश रेड्डी, डॉ. भोंगाडे, डॉ.संतोष देठे , प्रा. सुवर्णा नलगे, तसेच आयोजक ग्रंथालय प्रमुख डॉ. सारिका साबळे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.