(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील नगर परिषदेच्या प्रभाग क्र.८ मधील किल्ला वार्डातील कुणबी सोसायटीमध्ये ३५ लक्ष रुपये खर्चाच्या ध्यानसाधना केंद्र सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या हस्ते नुकतेच झाले.
यावेळी न.प.चे उपाध्यक्ष संतोष आमने, बांधकाम सभापती रेखाताई खुटेमाटे, प्रभाग क्र.८ चे नगरसेवक तथा माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, महिला व बालकल्याण सभापती रेखाताई राजुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.