क्रिकेट स्पर्धेदरम्यान युवकाला गंभीर जखमी करणाऱ्या गुंडावर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करण्याबाबत उलगुलान संघटनेची मागणी.
मुल:- मुल येथे काल दिनांक १०/१/२०२१ बजरंग सेना प्रस्तुत संतोष भाऊ रावत चषक भव्य अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी क्रिकेट सामन्यादरम्यान एका तरुणाला जबरन मार हान केली आहे. अश्या काही गुंड प्रवृतीचे मुलांनमूळे मूल या तालुक्याची बदनामी झाली आहे. मूल मध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. तसेच ग्रामीण भागाच्या मुलांन मध्ये सुद्धा मूल मध्ये येऊन खेळाची भीती झाली आहे मूल हा शांत तालुका असून येते भीतीचे वातावरण पसरले आहे क्रिकेट सामना खेळायला आलेल्या युवकांना काही शुल्लक कारणावरून मूळ येथील काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी जबर जखमी करून त्याच्या डोक्यात गाडीची चावी घुसवली व लोखंडी राळणे मारहाण केली. तसेच त्या युवकांना सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तींना सुद्धा जबर मारहाण केली. सदर क्रिकेट स्पर्धेला कोणतीही परवानगी नसताना आयोजकांनी हा क्रिकेट सामना भरविला कसा हा मोठा प्रश्न असून यामध्ये या युवकांना मूल शहरातील बड्या नेत्यांचा आशीर्वाद आहे असे आढळून येते.मूल शहरासाठी ही अत्यंत गंभीर घटना असून यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रमाण शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे . काहि राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळेच युवकांना अशा विनापरवानगीच्या सामन्याचे आयोजन भरविले जाते व यांना पाठिंबा दिला जातो. यामुळेच अशा प्रवृत्तीच्या लोकांचे मनोबल वाढते व यामधूनच असे प्रकार घडून येतात. ही बाब अतिशय चिंताजनक असून मूल शहरातील शांती भंग करण्याचा प्रकार आहे. यावर तात्काळ कारवाई करून सदर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर तात्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी करिता उलगुलान संघटना शाखा मूल द्वारे प्रशासन व पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
अशा गंभीर गुन्हा करणाऱ्या युवकांची तात्काळ चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अन्यथा उलगुलान संघटना शाखा मुल द्वारा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संबंधित शासन व प्रशासनास देण्यात आला.
निवेदन देतांना उलगुलान संघटनेचे शाखा अध्यक्ष निखिल वाढई, उपाध्यक्ष प्रणित पाल, आकाश येसनकर, रोहित शेंडे, कथा उलगुलान संघटनेचे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.